Wednesday, January 27, 2010

ऑल इडीयटस

चौथे  पान - ऑल इडीयटस

    3 idiots बघितला . फारच सुंदर बनवला आहे. घरी आल्यावर पिक्चर चे reviews वाचत होतो. एका २५ - २६ वर्षाच्या मुलीनी लिहिलेला अभिप्राय वाचला. "माझ्या आई-बाबांनी जर हि movie ७-८ वर्षांपूर्वी बघितली असती तर कदाचित आज मी एक engineer न होता एखादी कलाकार असते .. " आणि असेच बर्याच लोकांनी अभिप्राय दिले होते ..
आणि मन तिथेच थांबलं. वाटलं , काहीतरी चुकतंय ....  3 idiots च्या निमित्तानी आपण सरळ आपल्या आई-बाबांना दोष देऊन
मोकळे तर होत नाही आहोत ना ?

    पल्या शैक्षणिक पद्धतीत १०वि - १२वि पर्यंत शिकलेल्या १६ -१७ वर्षाच्या मुलाला खरच कळतं कि मला आपल्या आयुष्यात पुढे ४० वर्ष काय करायचं आहे ? पाश्चिमात्य देशात जिथे मुलं १६ व्या वर्षी घराबाहेर पडतात - स्वतंत्र होतात - त्यांना कदाचित २-३ वर्षात काळात असेल जगाची रीत. पण भारता सारख्या संस्कृतीत हेच logic चालेल का ?

    खादा मुलगा खूप छान हॉकी खेळतो पण जर तो भारताच्या ११ च्या संघात जागा मिळवू शकला नाही तर त्याची किंमत
काय समाजात ? मध्यंतरी एक बातमी वाचली कुणी तरी भारताच्या संघात खेळलेला हॉकी खेळाडू आता रोजंदारी वर मजुरी करतोय. कितीही कटू असला तरी हे सत्य आहे. कुठल्या आई बाबांना आवडेल हे भविष्य आपल्या मुलासाठी ?

    रं काहीही झालं कि आपण लगेच सचिन तेंडूलकर चं उदाहरण देऊन मोकळे होतो. पण या १२० करोड लोकांच्या देशात सचिन एकच हो ! १ सचिन यशस्वी झालं पण लाखो - करोडो नितीन - सुनील अपयशी होऊन खितपत पडले त्यांचा काय ? एखादा सुंदर painting करणारा painter , चित्रपटाचे फलक बनवत आयुष्य काढतो आणि अगदी सुमार असणारा software engineer मात्र गाडी फिरवतो. सांगा काय चुकलं आई बाबांचं , त्यांनी आपल्या मुलांसाठी safe भविष्य निवडलं यात ?

    स्ट्रेलिया सारख्या देशात जर तुम्ही खेळाडू असाल , एखादे कलाकार असाल तर तुम्हाला सरकारी पगार मिळतो , पेन्शन मिळते . आपल्याकडे आहे अशी काही शाश्वती ? बरं खरच आता जर संधी मिळाली तर किती लोक आपली गलेलट्ठ पगाराची नोकरी सोडून आपल्या कलेच्या मागे जातील ? ९५ % टक्के लोक त्यापेक्षा अधिक पैसा मिळावा म्हणून MS किंवा MBA ची निवड करतील.

    3 idiots मधला अजून एक संदेश मात्र आपण सगळे अगदी सोयीस्कर रित्या विसरलो. तो म्हणजे विषय समजून घेण्याची प्रवृत्ती आणि creativity. आपल्या शैक्षणिक पद्धतीत काहीतरी अगदी मुलभूत चुकतंय . creativity - creativity म्हणजे तरी शेवटी काय ? कुणी तरी ठरवून ठेवलेल्या वाटेपेक्षा वेगळ्या वाटेनी जाणं आणि त्यातून नव निर्मिती होणं !  त्यात चुका होणारच . पण आज असं जर आपण शाळेत - कॉलेजात केलं तर ? चालेल ? असा विद्यार्थी कदाचित कधीच पास होणार नाही. चुका करणं बरोबर आहे असं मी म्हणणार नाही पण चूक होईल म्हणून त्या वाटेलाच जायचं नाही हि वृत्ती धोकादायक आहे.

    पिकासो नि म्हटल्या प्रमाणे "प्रत्येक मुल जन्मत , तेव्हा ते एक कलाकारच असतं ... " आणि त्याला यातनं बाहेर काढायचा काम शाळा करतात. creativity ला जपायच नव्हे  तर तिला मारायचं काम करतात. आपल्या शाळा, लहान मुलांच्या कल्पेनेला भरारी घ्यायला न शिकवता तिला चाकोरीत बंदिस्त करण्याचा काम करतात. आणि तिथंच आपलं गणित चुकतं ... अमुक एका प्रश्नाचं अमुक एक उत्तर असेल तरच मार्क मिळणार. शाळेत न गेलेल्या किंवा अगदी कसे बसे पास झालेल्या लोकांमद्धे Einstein , edison , HG Wells , James Clark , Nikola टेसला या सारखे लोक होते याचं आश्चर्य नाही वाटत. कदाचित शाळेत न गेल्यामुळेच हे लोक आपली creativity टिकवून ठेवू शकले असतील. काय सांगावं ?

    पल्या शाळा या केवळ यांत्रिक कामगार तयार करत आहेत आणि या ओघात निसर्गाने आपल्याला - केवळ मनुष्य प्राण्याला दिलेलं सर्जनशीलतेच वरदान आपण विसरत चाललो आहोत. मला वाटतं काळाची गरज म्हणून तरी आता हे आपण ओळखायला हवं.

    माझ्या आजोबांच्या काळी १० वी पर्यंत शिकला कि नोकरीची शाश्वात्ती होती, बाबांच्या काळी graduate होणं नोकरीसाठी आवश्यक होतं. आता मात्र graduate मुलाला काळं कुत्रं सुद्धा विचारत नाही. आणि ज्या प्रकारे लोक PG आणि PHD होत आहेत त्यावरून वाटतं , कि पुढच्या पिढीत जेव्हा सगळ्यांकडेच डिग्री असेल तर मग नोकरी मिळणार कुणाला ? मला असा वाटतं त्यावेळी सर्जनशीलता हा एकच गुण असेल जो यश - अपयशातला फरक ठरवेल.

    तुम्ही म्हणाल काय लिहितोय ? "चीत भी मेरी और पट भी मेरी " असं ... अहो प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात ... माझं काम फ़क़्त दोन्ही बाजूचं आकलन करून समोर मांडणं आहे .. ज्याला जी बाजू आवडेल त्यांनी ती निवडावी .
    रं सांगायचं तर मला असं मनापासून वाटतंय कि या पानाची भट्टी काही फारशी नीट जमली नाही पण केवळ विषय relevant आहे आणि वाचणारे सगळे माझे मित्र मंडळी - म्हणून publish करण्याचा धाडस करतोय . चूक भूल माफ असावी .

नेहमी प्रमाणे शेवट एका कवितेनी करतो ..

सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो

हे नवे फक्त आले पहारेकरी
कैदखाना नवा कोठला यार हो

ते सुखासीन संताप गेले कुठे
हाय, जो तो मुका बैसला यार हो

चालण्याची नको एवढी कौतुके
थांबणेही अघोरी कला यार हो

जे न बोलायचे तेच मी बोलतो
मीच माणूस नाही भला यार हो

सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी
जीवनाची टळेना बला यार हो

हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी?
हुंदकाही नसे आपला यार हो

ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो

लोक रस्त्यावरी यावया लागले
दूर नाही अता फैसला यार हो

आज घालू नका हार माझ्या गळा
मी कुणाचा गळा कापला यार हो

तुमचा शंतनू

11 comments:

 1. Chan banavala aahes blogs .. lihitos hi chan .. pan sadhys frustu surr ka laglay :P:P ... photos chan aahet.. Kokan ..aaplyasathi California aahe ;)

  ReplyDelete
 2. Sorry mala marathi typing farse yet nahi mhanoon minglish madhye lihito...

  Tuzha mhanana khara ahe, there is nothing wrong in deciding a safe future for your kids. However taking it to exremes is wrong. The movie in 2 hours cannot express the philosphy of life in its entirety so I think we feel that the movie is shallow in some aspects, but if we do some serious thinking then we realize that if we make our passion as our job, we can conquer great heights. Mala vatate 95 % of the people spend their lives finding out what their passion is ...and the 5 % contain the sachin tendulkar.
  My point is parents should not compete with their peers through their kids. I have seen parents pressurizing their kids saying..mazha mitracha mulga / mulgi 1st ala, mag tula ka nahi marks milavta yet....
  This is wrong.

  Any ways, you have nicely put all this...

  ReplyDelete
 3. The more I read it the more I tend to agree with you mandar. I had a similar limitation of words when addressing all ideas and all aspects of this topic. Its so dearly and so multi-faceted that there are bound to be deficiencies if someone like me tries to analyze with whatever little knowlegde i have.
  Thanks for your comments mandar.

  ReplyDelete
 4. I read the entire post! Guess reading Marathi is not so difficult :)
  I liked the way you have organized your thoughts. Will keep visiting for more :)

  ReplyDelete
 5. शंतनु,
  तुमचा ब्लॉग मी मराठीब्लॉगस्पॉटद्वारे वाचला आहे.
  सगळेजण creativity च्या मागे लागतात पण हे विसरतात की रचनात्मक द्रुष्टीकोणासाठी ज्ञानाची जोड़ आवश्यक असते. थ्री इडियट्स मधे देखील रॅंचोला ज्ञानाची अत्यंत आवड दाखविली आहे.
  तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे - प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.
  असच लिहिणे भविष्यात सुरू ठेवा.

  ReplyDelete
 6. Hi shantanu,
  लिखाण अतिशय सुंदर .especially abt 3 idiots.u can think in right way . keep it up.waiting for new things

  ReplyDelete
 7. प्रिय शंतून,
  पोस्ट विचार करायला लावणारी आहे. मला नेहमी काही शंका पडतात, की मला अमूक मिळालं असतं, तर तमूक झालो असतो का? मला याच कोर्सला जातं आलं असतं, तर ते करता आलं असतं का ? इत्यादी इत्यादी. अर्थातच, या गोष्टी शिक्षणाशीच सर्वाधिक संबंधित असतात. पालकांपेक्षाही. म्हणजे आपण जी शिक्षण पद्धती स्विकारली आणि जोपासली, त्यामध्ये निश्चितच काही दोष आहेत. 'गोलमेज परिषद' हे मला पडलेलं कोडं. खूप वर्षांनी 'Round Table Conference' म्हणजे गोलमेज हे कोडं उलगडलं. आपल्याकडं 'घोकंपट्टी'ला खूप महत्व आहे आणि सृजनाला कमी लेखलं जातं. 'बिकट वाट वहिवाट नसावी', हे शाळेतच शिकतो आपण. आहे ही शिक्षण व्यवस्था सुधारणं आणि सृजनशील बनवणं, सर्वप्रथम करायला हवं. त्यासाठी आपली सृजनाची व्याख्या बनवायला हवी आणि मग सुधारणांच्या मागं लागायला हवंय...खूप जड बोजड झालं का हे?...असो.

  ReplyDelete
 8. Khup sundar lihitos.lekh awdla.keep writing.

  ReplyDelete
 9. प्रिय शंतनू
  ३ Idiots चा ब्लोग वाचला. खूप चांगल्या पदधतीने विचार मांडले आहेत.शिक्षण पद्धती सदोष आहे. पण सामान्य माणूस या चुका समजून
  दुरुस्ती होई पर्यंत एखाद्या चे शिक्षण संपून जाते.आयुष्याची दिशाच बदलते . उरते ती फक्त हुरहूर .. चुटपूट ..
  एक सुस्कारा टाकून ..

  ऑल द बेस्ट .
  डॉक्टर वंदना गांधी ९९२१९५५००७ / ९४२२६४४१००

  ReplyDelete
 10. Hi Vandana
  Thanks for reading the Post.
  I agree with you. The irony is that the realization comes far too late for all of us.
  :(

  ReplyDelete