Monday, February 15, 2010

दुर्दम्य

पाचवे पान - दुर्दम्य

    डा मारला तरी एखाद्या आशिष नावाच्या मुलाला लागेल इतकं common नाव आणि घुळघुळे असं विचित्र आणि उच्चारायला कठीण आडनाव असल्यामुळे स्वाभाविक पणे "गुल्लू" असं टोपण नाव मिळालेला हा ... या गुल्लूचिच हि गोष्ट.

    म्ही दोघे MCA ला सोबत होतो पण काही कारणानी माझ्या आठवणीत याची आणि माझी पहिली भेट पहिल्या semester च्या परीक्षेच्या महिनाभर आधी झाली. संध्याकाळी घरी अभ्यास करत असतांना एक काळी सनी माझ्या घराचा पत्ता शोधत शोधत येऊन थांबली. सनी वरची भांबावलेली बटू मूर्ती आणि
त्या छोट्या शरीरावर, वाढलेल्या दाढीमुळे प्रौढ वाटावा असा चेहरा ! कसल्याश्या Notes घेण्यासाठी हा माझ्या घरी आला होतं. विस्कटलेल्या केसांमुळे अधिकच संशयास्पद दिसणाऱ्या या व्यक्ती ला, जी स्वत ला माझं classmate म्हणवते , तिला Notes द्याव्या कि नाही असा प्रश्न पडला. पण त्यावेळी MCSD ची तयारी करत असल्यामुळे कॉलेज ला पूर्ण semester तोंडच दाखवलं नव्ह्तं म्हणून ओळखत नसेल कदाचित , असा विचार करून याला मी Notes दिल्या.

    विलक्षण लाघवी स्वभाव आणि माणसं जोडण्याची कला असलेला गुल्लू कॉलेज मध्ये तर लोकप्रिय होताच पण माझा अगदी बेस्ट फ्रेंड कधी झाला ते माझं मलाच कळलं नाही. तसा मी अगदी लहानपणापासून एकलकोंड्या स्वभावाचा होतो. आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच ज्याला बेस्ट फ्रेंड म्हणावं असं कुणीतरी भेटलं होतं. दिवस जात गेले तसतशी आमची मैत्री अधिक अधिक घट्ट होत गेली. बाकी मित्रांकडून समोसा पार्टी कशी उकळायची येथपासून अस्मिता नावाच्या आमच्या एका जाड मैत्रिणीला दुसऱ्या दिवशी कसं चिडवायचं अगदी इथपर्यंत सगळी खलबतं रात्री माझ्याघरी तो अभ्यासाला आला असतांना शिजायची.

    कॉलेज म्हटलं कि ग्रुप्स आलेच. तसं म्हटलं तर आम्ही दोघे कुठल्याच ग्रुप मध्ये नव्हतो आमच्या दोघांचा स्वताचाच असं एक ग्रुप - ज्याचं एकमेव लक्ष्य म्हणजे दुसऱ्यांची मस्करी करणं. पण एका दिवशी काही कारणांनी गुल्लू ला बिहारी ग्रुप मधल्या एका मुलानी मारलं आणि त्यादिवशी पासून आम्ही मराठी ग्रुप चे दत्तक सदस्य झालो. कुणी सोबत नसतांना केवळ बिहारी ग्रुप ला पाणी पाजायच म्हणून इंटर collegeate फेस्टिवल साठी नाटक बसवायचं असं "मी" ठरवलं. कुणी सोबत नव्ह्तं म्हणून स्वाभाविकच गुल्लू आणि बिहारी ग्रुप च्या hitlist वर असलेला नितीन अशा तिघांनी मिळून ३ दिवसात एका फालतू कथानकावर नाटक बसवलं आणि गुल्लू ने स्क्रिप्ट मध्ये टाकलेल्या कमरेखालच्या आणि काही कमरेवरच्या अशा जोक्स च्या जोरावर नागपूर मधून पहिलं बक्षीस मिळवलं.

    पुढे कॉलेज संपलं नोकरी सुरु झाली मी आणि गुल्लू दोघेही मुंबई ला नोकरी ला लागलो. हळू हळू फोन कमी होऊ लागले. एक दिवस मी ऑफिस मध्ये असतांना अचानक गुल्लू चा फोन आला. तो फार भांबावलेला वाटला. मला अंधेरी स्टेशन वर भेटायला बोलवत होता. मी भेटायला गेलो , पाहतो तर याचं शर्ट रक्तानी माखलेलं होतं. विचारल्यावर यांनी मला सांगितलं - लोकल मधून ऑफिस ला जातांना चालत्या लोकल मधून डोकावणाऱ्या माणसाला कडेचा खांब लागला. त्याचं डोकं पार फुटलं. सगळे बघे फ़क़्त बघत असतांना गुल्लू ऑफिस सोडून त्या माणसाला बाकी काही लोकांच्या मदतीनी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला आणि तिथे त्याच्या घरचे लोक येई पर्यंत - ३ तास थांबला. त्याचंच हे रक्त. त्या दिवशी पहिल्यांदा मला असं वाटलं कि जगात माणुसकी जिवंत आहे आणि ती माझ्यासमोर रक्ताने भिजलेल्या शर्टात उभी आहे - साक्षात मूर्तिमंत ...

    पुन्हा आयुष्याचं रहाटगाडगं सुरु झालं. मला अमेरिकेला जायचं होतं , त्याआधी एकदा भेटावा म्हणून मी आणि प्रफुल या माझ्या मित्रानी - आम्ही गुल्लू ला फोन केला. कळलं कि तो जुहू च्या हॉस्पिटल मध्ये सकाळ पासून भरती आहे. कसलासा ताप आला आहे म्हणून. आम्ही दोघेही त्याला भेटायला गेलो. याची परिस्थिती वाईट होती. डॉक्टर काही सांगायला तयार नव्हते फ़क़्त एव्हढंच कळलं कि त्याच्या WBC सामान्य लोकांपेक्ष्या १० पट जास्त झाल्या आहेत. आम्ही दोघांनी मिळून त्याच्या बरोद्यातल्या भावाला फोन करून बोलावून घ्यायचा ठरवलं. ४ दिवसात मी अमेरिकेला निघून गेलो काही serious असेल अशी कल्पना सुद्धा आली नाही. फक्त आजारी असल्यामुळे त्याला नागपूरला नेला असं कळलं. काही दिवसानंतर त्याच्या घरी फोन केल्यावर कळलं कि डॉक्टरांनी त्याला लयुकेमिया किंवा ज्याला blood cancer म्हणतात ते असल्याला निदान केलं. माझ्या पायाखालची वाळू सरकली होती . अकल्पित असं काहीतरी झालं होतं ...

    मी जरी राकट दिसत असलो तरी अगदी लहानपणापासून माझा स्वभाव खूप हळवा आहे. कुणाचं दुख मला बघवत नाही . आणि जर मी काही करू शकत नसेन तर पळवाटा शोधून त्यापासून जास्तीत जास्त दूर जायचा प्रयत्न करतो. अमेरिकेहून आल्यानंतर गुल्लुच्या बाबांशी सतत संपर्कात होतो. मात्र गुल्लुशी जाऊन भेटायचं त्याच्याशी बोलायच धाडस काही झालं नाही. ३ महिन्यानंतर नागपूर ला आल्यावर नितीन सोबत गुल्लू कडे गेलो.

    गुल्लू ला Chemothearapy सुरु झाली होती. Bone Marrow Replacement साठी घरच्या कुणाचाच match नव्हता. बाबा एकटे काम करणारे - ते पण retire झाले होते. ५५ किलो चा गुल्लू आता केवळ ३० किलो राहिला होता. डोक्यावर केस नव्हते , भिवया नव्हत्या. हाडांवर केवळ निस्तेज कातडी चा पातळ पापुद्रा राहिला होता. त्याला असं बघितल्यावर मला रडूच कोसळलं. अगदी कसंबसं स्वता:ला सावरलं . पण याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी निश्चल. वेदेनेच्या सीमेपलीकडे गेल्यावर अश्रू सुद्धा आटून जात असतील कदाचित ...

    ण आम्हा दोघांना बघितल्यावर त्याच्या डोळ्यात तिच चमक पुन्हा आली. कुठल्यातरी विलक्षण आशावादापोटी आणि श्रद्ध्येपोटी तो आम्हाला त्याचे बरे झाल्यानंतरचे plans सांगत होता. जणू काही आम्ही त्याला नव्हे, तर तो आम्हाला आजारी असताना भेटायला आला आहे, या थाटात बोलत होता . पण बोलण्यात कुठेतरी आईबाबांना होणाऱ्या वेदनेची किनार होती. देवावर अतूट विश्वास आणि दुर्दम्य आशावादामुळे तो त्या क्षणी महामानव आणि आम्ही खुजे झालो होतो.

    डॉक्टरांचा आणि कुणाचाच विश्वास नसतांना ६ Chemothearapy च्या cycles घेतल्यानंतर आणि तब्बल २ वर्ष प्राणपणानि मुकाबला केल्यानंतर या बटू वामनानं मृत्यूला हरवलं होतं - चारी मुंड्या चीत केलं होतं.

    लोक inspirational पुस्तकं वाचतात , चित्रपट बघतात. आज मला याची काहीही गरज नाही कारण "गुल्लू" नावाच्या एका inspiration च्या झंझावाताला माझ्या आयुष्यात मी स्वत अनुभवलंय.

    नेहमी प्रमाणे शेवट एका कवितेनी -- William Ernest Henley याची Invictus (अपराजित) अशी हि कविता नुकतीच वाचनात आली ...
[I captured this photograph at New Briton - England. This is one of my most favourite photos. ]

तुमचा शंतनू

गुल्लू सध्या Globallogic नावाच्या कंपनीत "काम" करतो. दिसतंय ना ?
आणि part time अमेरिकेत सत्यनारायाणाचे contracts घेतो
प्रफुल EBAY नावाच्या एका "छोट्याश्या" कंपनीत जुना माल विकण्याचा धंदा करतो
मी काम करत नाही. पोटापाण्यासाठी Persistent नावाची कंपनी थोडे बहुत पैसे देते त्यात घर चालतं.

13 comments:

 1. shantanu-tujhi hi post chhan lihilis---really touching---keep writing

  ReplyDelete
 2. can we have some hindi/english tranlations please.. top reads seem too good to miss.

  :)

  ReplyDelete
 3. I will try to see if I can put some automatic translation script in place. But the fun of reading goes away once it is translated. Anyway thanks for the complement Vikas bhai.

  ReplyDelete
 4. Bhaiyya Nagapurkaranchya bhashet Sangayache jhale tar dil khush jhala junya pan jivhalyachya athavanini...Ashish truly rocks...ani Shantanu saheb tumhi ya atavaninina web duniyetalya kagdanwar jiwant kelyabaddal dhanyawad...

  ReplyDelete
 5. Khup mast ahe ha post...ani gullu always rocks..

  Mazya Sudarshan Salape navachya mitrane mala aaj hi link dili vachayala...very nice blog..i liked it.

  Cheers,
  Sandy

  ReplyDelete
 6. Gullu sir is an inspiration and a character to look upto in real life, Been with him for the past year now, couldnt even imagine that person has thru most of the tragics of life...Jai Ho Gullu Sir...you always rock :)

  Thanks Shantanu bhai for this wonderful piece of writing on this "changla" character (Gullu sir) :)

  ReplyDelete
 7. Thanks Everyone for a fabulous response to the post. Your comments - complements are very important. Keep writing .

  Enjoy reading

  ReplyDelete
 8. mi aaj tuzya war fida zaali.......
  tu lihitos he aaj mala pahilyanda ch kalala.
  khup chan......mi roj vachat rahin tuza blog...
  am simply impressed....

  ReplyDelete
 9. Thanks Madhura
  मंडळ आपले आभारी आहे !

  ReplyDelete
 10. खूपच अविश्वसनीय कथा आहे
  पण वाचनीय आहे

  ReplyDelete