Tuesday, February 23, 2010

काळ आला होता ...

सहावं पान - काळ आला होता ...

    युष्यातले काही प्रसंग असे असतात जे मनात अगदी दगडावर कोरावं तसे कोरले गेले असतात. नुसत्या आठवणींनी सुद्धा थरकाप उडावा असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यात आला होता त्याचीच हि गोष्ट !

    वर्ष झालेत त्याला. माझी पहिलीच Onsite ट्रीप होती. मी बर्चवूड नावाच्या इंग्लंड मधील manchester पासून ३० KM वर असलेल्या एका छोट्या गावात होतो. प्रोजेक्ट वर असल्यामुळे कंपनी नि राहायला घर दिला होतं. १४ Partrige close या पत्त्यावर आम्ही राहायला येऊन आता ४ महिने झाले असतील. हा पत्ता मी जन्मभर विसरू शकणार नाही कारण माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात भयानक प्रसंग येथे घडला होता.

    र्चवूड तसं अगदी छोटंसं गाव ! ४ - ५ हजार लोकांची वस्ती असावी . पण गावात तसे फार काही उद्योग धंदे नसल्यामुळे मुख्यता म्हातारी , बेरोजगार माणसे आणि कॉलेज कुमार यांचाच भरणा होता. तसे सगळे लोक चांगलेच होते . पण डाउनटाउन संध्याकाळी ५ वाजता बंद होऊन जायचं सगळा शुकशुकाट - मॉल बंद सगळं बंद ! बर्याच वेळा ५ नंतर तिथे असलं तर टवाळ मुलं शिव्या द्यायचे , पाठी लागायचे. पण कधी काही वाटलं नाही . नेहमी ग्रुप मध्ये हिंडायचं हा नियम आम्ही कसोशिनी पाळत होतो.
   
    कंपनी च्या या क्वार्टर मध्ये आम्ही तिघे राहात होतो. मी , माझा manager संतोष आणि मंदार. मी आणि संतोष खालच्या मजल्यावरच्या बेड रूम मध्ये झोपायचो तर मंदार पहिल्या मजल्यावरच्या बेड रूम मध्ये. ऑफिस अगदी १० मिनिटाच्या अंतरावर होतं त्यामुळे आम्ही पायी जायचो आणि पायी यायचो. सकाळी ८ ला ऑफिस मध्ये गेलं कि एकदम संध्याकाळी ७ ला पायी परत ! घरी आल्यावर स्वयंपाक - जेवण झालं कि ११ पर्यंत गप्पा रंगायच्या आणि मग झोप असं दिनक्रम होता.

    २७/१२ २००५  चा दिवस पण साधारण असाच होता. नुकताच क्रिसमस होऊन गेला होता , आधीच्या दिवशी स्नो पडला होता, त्यामुळे हवेत गारवा होता. साधारण -२ वगेरे तापमान असावं ! नेहमीप्रमाणे गप्पा झाल्या आणि आम्ही झोपलो. रात्री साधारण १ वाजता संतोषनि मला उठवलं "कसला तरी आवाज येतो आहे यार ." संतोष म्हणाला.
    मी गाढ झोपेत होतो. मी तसाच त्याला उडवून लावलं. "तुला काही तरी भास झाला असेल झोप यार."

    थोड्या वेळानी पुन्हा त्यानी मला उठवला . या वेळी मला सुद्धा स्वयंपाक घराच्या दिशेनी थाड थाड असा आवाज आला. बेड रूम चा दरवाजा उघडून आम्ही आवाजाकडे जायला लागलो. संतोष पुढे आणि मी मागे . तितक्यात मुख्य दरवाज्यावरची काच तोडून एक मोठी कुंडी आत आली आणि संतोष च्या डोक्या ला २ इंचा नि चुकवत जाऊन भिंतीवर आदळली.

  म्हाला कळलं , कुणी तरी घरावर हल्ला केला होता. काही कळायच्या आतच मोठे मोठे दगड आत यायला लागले.  स्वयंपाकघरात काचेचा खच पडला. आम्ही जोर जोरात मंदार ला हाका मारायला लागलो. आजू बाजूचं कुणी येईल म्हणून मदती साठी ओरडायला लागलो. पण आजूबाजूला सगळे म्हातारे लोक राहायचे. कोण येणार मदतीला ? मंदार झोपेतच खाली आला. त्याला खालच्या बेड रूम मध्ये घेतलं आणि दरवाजा बंद केलं आणि दरवाज्याला पलंग आणि टेबल रेटून लावला.

    मृत्यूला असं २ इंच अंतरावर बघितल्यावर संतोषची बोलतीच बंद झाली होती. तो थरथर कापत होता. संतोष ला पलंगाच्या खाली लपवून मी आणि मंदार आम्ही काय करायचं याचं विचार करत होतो. सुदैवानी ३ दिवसांपूर्वी वेंकी भारतात गेला होता त्याचा मोबाईल फोन मंदार कडे होता. पण आमच्याकडे पोलिसांचा नंबर नव्हता. आम्ही नंबर शोधायला लागलो सगळं ईकडे तिकडे केल्यावर शेवटी नंबर सापडला. अर्धा तास होऊन गेला होता हल्लेकरू आता बाहेरच्या मातीच्या कुंड्या दरवाज्यावर मारत होते. दरवाजा तोडून आत येण्याचा त्यांचा प्लान असावा. जोर जोरात शिव्या देत होते. "Bloody pakis ...bas**** M*****F ****** " वगेरे अशा . आवाजावरून ते प्यायलेले असावे असा वाटत होतं. त्यामुळेच ५ मिनिट आत दगड फेक केल्यावर ५ मिनिट शांत बसत असावेत कदाचित.

    पोलिसांच्या नंबर वर फोन केल्यावर operatar नि अगदी भारतीय style मध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली. ईथे आमची फाटून हातात आली होती आणि हि बया आम्हाला विचारात होती "किती दगड आत आलेत " , "किती काचा पडल्या आहेत " , "हल्लेकरू कसे दिसतात" वगेरे वगेरे. भारतावर इंग्रजांचच राज्य होतं याची पक्की खात्री मला तेव्हा पटली. १० मिनिटांच्या प्रश्नोत्तरानंतर तिनी मला सांगितलं कि पोलिसांची कार आज बर्चवूड मध्ये नाही . वोरिंगटन स्टेशन वरून यायला वेळ लागेल. कसं बसं जीव मुठीत घेवून आम्ही बसलो होतो.

    कडे हल्लेखोरांनी बाहेरच्या माळीकाम करायच्या फावड्यानी दरवाज्यावर मारायला सुरुवात केली होती. मृत्यू आणि आम्ही यामध्ये २ इंच जाडीचा तो लाकडी दरवाजा बाजीप्रभू सारखी खिंड लढवत उभा होता. साधारण अडीच च्या सुमारास आम्हाला पोलिसांचा सायरन ऐकू आला. आवाज ऐकून हल्लेखोर पण पळून गेले असावेत कदाचित.

    रात सगळीकडे माती , दगड , काचांचा ढीग पडला होता. पोलिसांनी आमची विचारपूस करून आम्हाला घातलेल्या कपड्यानिशी दुसऱ्या गेस्ट हाउस वर नेलं. तो आमचा इंग्लंड मधला शेवटचा आठवडा होता. आम्ही तिघेही लगेच २ जानेवारी ला भारतात परतलो. अगदी सुखरूप ... तो दीड तास आमच्या तिघांच्याही आयुष्यातला सगळ्यात भीतीदायक असा तास असावा. आनंद याचाच कि आम्ही जिवंत राहिलो - दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय बघण्यासाठी.
    काळ आला होता , पण वेळ आली नव्हती.
टीप : कवितांची वेगळी site तयार केल्यामुळे आज कविता नाही. कृपया कवितांच्या या संग्रहाला अवश्य भेट द्यावी ... http://manik-moti.blogspot.com/

कळावे लोभ असावा !
तुमचा शंतनू

17 comments:

  1. बाप रे.. भयंकर अनुभव !!

    ReplyDelete
  2. असला अनुभव , देव करो कधी कोनावरही न येवो

    ReplyDelete
  3. Yes it was near death experience for us.
    Thanks for comments.
    Please keep visiting
    -Shantanu

    ReplyDelete
  4. Your all articles are very nice !! keep it up writing ! & best luck for your write up !

    ReplyDelete
  5. baap re..vachun ekdam kata ala..!! :-O

    ReplyDelete
  6. एकदम थरारक अनुभव...

    ReplyDelete
  7. महाभयंकर अनुभव !!

    एकदम हा तुमचा अनुभव मी तुम्हा तिघांकडून वेगवेगळ्या वेळी ऐकला होता. प्रत्येक वेळी मला तुमचे कौतूक वाटले की तुम्ही स्वतः घाबरलेले असूनही एकमेकांना आधार देत होता.

    Hats off to you!!!

    ReplyDelete
  8. @ अनिल , स्वप्नजा , दवबिंदू - अभिप्राय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद.
    @योगेश : हो त्या सगळ्या परिस्थितीत मंदार सगळ्यात खंबीरपणे उभा होता. आणि हो तिघे सोबत होतो म्हणूनच सगळं निभावून गेलं. अभिप्राय दिल्याबद्दल आभार. सध्या कुठे आहेस ? नॉरवे ?

    ReplyDelete
  9. kadhi bolala nahis yabaddal .. aaj vachun kata oobha rahila.

    ReplyDelete
  10. लाईफ टाईम चा अनुभव घेतला आहे. व्यक्त पण छान केला आहेस.

    ReplyDelete
  11. बाप रे.. भयंकर अनुभव !!

    ReplyDelete
  12. भयानक अनुभव आहे पण तुम्ही तो खुपच छान शब्दात मांडला आहे.
    "भारतावर इंग्रजांचच राज्य होतं याची पक्की खात्री मला तेव्हा पटली." आवडले.

    ReplyDelete