Tuesday, March 16, 2010

मधु-स्वर्ग

    "फ़क़्त चित्रात शोभून दिसेल असा दिवस " असं जर खरच काही असेल तर तो मागचा रविवार होता. बोच्र-या थंडी नंतर आज तापमान ८ डिग्री पर्यंत जाणार होतं. कुठे बाहेर फिरायला जावं असा विचार करत असतांना वर्तमानपत्रात एक जाहिरात दिसली. ओटावा चं उपनगर असलेल्या "Cumber Land " मधल्या एका शुगर बेरी फार्म ची हि जाहिरात होती. कुतूहलापोटी काय आहे बघावं म्हणून मी जायचं ठरवलं . माझ्या घरापासून साधारण बस ने दीड तास लागला मला पोचायला आणि पुढे पायी १५ मिनिटे.

    संत अधिकारीकारीत्या जरी अजून काही आठवडे दूर असला तरी निसर्गाला त्याची चाहूल कदाचित आधीच लागली असावी. आणि कॅनडात, वसंताच्या आगमनाची पूर्वसूचना देण्यासाठी मेपल च्या झाडांपेक्षा अधिक योग्य दुसरं काय असणार. उबदार दिवस दृष्टीक्षेपात असतांना , दिवसा साधारण ५ डिग्री आणि रात्री -५ अशा कक्षेत तापमान झोके घेत असतांना ओटावा मध्ये एक विशेष मोसम सुरु होतो - मेपल सिरप सीजन. नावावरून जरी अगदी शुष्क वाटत असलं तरी गोड आवडणाऱ्या लोकांसाठी मात्र हि पर्वणीअसते.

    शुगर बेरी फार्म वर पोचल्या पोचल्या पहिली गोष्ट जी नजरेत भरते ती म्हणजे पार्किंग मध्ये ठेवलेल्या वाहनांची लांबच लांब रांग. मनातल्या मनातच तुम्ही सुखावता कारण या गोड सफरीमध्ये तुम्ही एकटे नक्कीच नाहीत! या फार्म च्या मोठ्या दरवाजांनी जसं तुमचं स्वागत होतं तसच तुमचं स्वागत करतो तो हवेत दरवळणारा मंद मंद मेपल सिरप चा सुवास. त्या धुंद वासात मन हरपतं न हरपतं तोच तुम्हाला दिसते थोरामोठ्यांची आणि लहान मुलांची रांग - मेपल ची मिठाई बनवण्यासाठी. आपल्या हातानी हि विशेष मिठाई बनवण्याची मजा काही औरच!

    रम वाफाळतं मेपल सिरप चुरा केलेल्या बर्फावर टाकताच साधारण १० सेकंदात स्फटिकामध्ये रुपांतरीत व्हायला लागतं. आता फ़क़्त एक काडी घेऊन या स्फटिक रुपी मिठाई ला त्याभोवती गुंडाळायच, कि झालं. ३० सेकंदात बघाल तर तुमच्या हातात फ़क़्त काडी उरलेली असेल मेपल च्या या मिठाई शिवाय. कारण मिठाई आता शांतपणे पोटात पहुडत असते! क्षणभर डोळे बंद करून या स्वर्गीय चवीला मनात साठवून घेतलं कि आपण पुन्हा लगेच तयार होतो अजून एक मिठाई चा तुकडा बनवण्यासाठी आणि गट्ट करण्यासाठी.

    निवार - रविवारी हजारो लोक कळपा - कळपात मेंढरं जावी तसे येथे जमा होतात. काही शौकिनांची हजेरी मात्र प्रत्येक आठवड्याला लागते. फ़क़्त २ महिने चालणाऱ्या या मोसमाची मजा लुटायला असंख्य लोक इथे सतत वर्णी लावत असतात.

    शा फार्म मध्ये तुम्हाला हजारो मेपल ची झाडं आणि मेपल सिरप बनवण्याची प्रक्रिया बघायला मिळते. मेपल च्या झाडाचा चिक काढून त्याला बाष्पीकरण पात्रात उकळवल्या जातं. साधारण ३० ते ४० लिटर चिकापासून १ लिटर सिरप तयार होतो. आणि या वाफाळत्या सिरप पासून नंतर मेपल ची मिठाई तयार केली जाते. "असावा सुंदर चोकलेट चा बंगला" असं म्हणणाऱ्या लहान मुलाला काय वाटत असेल ते अनुभवायचा असेल तर हि ट्रीप करायलाच हवी.

    Wonderland मध्ये Alice फिरावी तसा मी अशा या मधु-स्वर्गात २ तास फिरत होतो. शेवटी १० मिठाई चे तुकडे गट्ट करून , २ तासानंतर मी तृप्त मनाने घराकडे निघालो - पुन्हा पुढच्या आठवड्यात येण्यासाठी !

    ( या लेखाचा मूळ पोस्ट मी येथे इंग्रजी मध्ये लिहिला होता : http://crooked-minds.blogspot.com/2010/03/candyllicious.html )

कळावे लोभ असावा !
तुमचा शंतनू

6 comments:

  1. wah wah , amhala pan yaychay!!!
    mastach warnan kela ahes!

    ReplyDelete
  2. Sala, khup wachala aahe ya maple syrup baddal. Ek batli gheuun yeshil bara majhya saathi.

    Saala aapalya deshat Neera milate, aani Bangal madhye lok tyacha gul karun khatat. Koni asa kahi banawat nahi.
    Aapalya deshat asa kahi wyayala pahije.

    ReplyDelete
  3. @ सायली - कधीही या - मेरा घर खुला है खुला हि रहेगा - तुम्हारे लिये ! :))
    @ सुजित - एक बाटली घेऊन येतो तुझ्यासाठी . खरं आहे , अगदी छोट्या गोष्टीचं marketing कसं करावं हे या लोकांकडून शिकावं.

    ReplyDelete
  4. वा! छानच आहे की मेपलची मिठाई तयार करण्याची प्रक्रिया. सुरेख!!

    ReplyDelete
  5. सर्वप्रथम तुअम्च्या ब्लॉगबद्दल... आकर्षक नाव, आकर्षक रंग... उत्कृष्ट सुट्सुटीत मांडणी!

    आता मधुस्वर्ग़ या विषयाबद्दल...

    १-२ वर्षांपूर्वी मी एक अनुवादीत पुस्तक वाचलं होतं, एका इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला होता... नाव आठवत नाही आता पण त्यात एका लहान मुलीचे भावविश्व चितारले होते... ती, तिच्या दोन बहीणी, आई, बाबा... त्यात त्यांचे राहाणीमान, पदार्थ साठवणे, खारवणे याचे रसभरीत वर्णन केले होते...

    हिवाळा संपता संपता पडणाऱ्या पावसाला "साखरेचा पाउस" म्हणत... कारण त्या काळात उत्कृष्ट मेपलकॅन्डी बनवता येइल असा उत्तम दर्जाचा मेपल चिक मिळे...
    मेपलच्या बुंध्यांना चिरा पाडून बादल्या बांधून ठेवत. त्यातून गळणारा चिक त्या बादल्यांतून गोळा करून त्याला उकळून घराबाहेरचा त्यातला त्यात स्वच्छ बर्फ़ बशा भरून आणत आणि त्यावर हा गरमागरम वाफ़ाळता चमक्दार गर्द मधाच्या रंगाचा मेपलरस ओतत... बर्फ़ चरचरत वितळे आणि वेगवेगळ्या आकाराची पारदर्शक चमकदार मेपलबर्फ़ी किंवा मेपलवडी तयार कचकन तुकडा तोडण्यासाठी... स्स्स तोंडाला अस्स पाणी सुटलेलं ना वर्णन वाचताना... आणि मग त्यांच्याकडे तो साखरपाउस संपायच्या सिझनदरम्यान मोठ्ठी पार्टी असे... घरातील सर्व जण जमून नृत्य करीत त्यांचे लांब फुगीर झगे घालून आणि मग सगळ्यांना पोटभर ती मेपलकॅन्डी खायला मिळे...

    अतिशय सुंदर आणि चविष्ट वर्णन केलेय बरं तुम्ही मेपलकॅन्डीचे...

    पु. ले. शु... लिहीत राहा...

    ReplyDelete
  6. खूप दिवस मी मेपल सिरप बद्दल माहिती शोधत होते आणि अचानक ती गवसली मी ती share केली तर चालेल का?
    lekh sundarch!....anjali gadre

    ReplyDelete