Tuesday, April 27, 2010

चीनी माती

    तुम्हाला सांगतो "अमिताभ बच्चन सारखा खोटारडा माणूस मी अजून पर्यंत पहिला नाही. " परवाच TV वर बघत होतो हा महाभाग पांढरे स्वच्छ कपडे घालून चक्क "चीनी कम है, चीनी कम है" म्हणून नाचत हिंडत होता! तुम्हीच सांगा जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश चीन - तर मग सांगा "चीनी कम है !" हे कसं काय खरं असू शकेल. मला वाटतं कदाचित या वाक्याआधी तो "व्यवहारशून्य " हा शब्द लावायला विसरला असावा. अहो खरच आहे , एखाद्या वेळेस सोंड नसलेला हत्ती सापडेल पण व्यवहारी नसलेला चीनी सापडायचा नाही.

    रं, एखाद्या भांड्यात त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त धान्य भरलं तर काय होईल ? ते ईकडे तिकडे सांडेल आजूबाजूला पडेल . तसाच काही तरी चीन्यांच  देखील झालं असावं.आता बघा ,हि माझी पाचवी Onsite ट्रीप - इंग्लंड , अमेरिका , फ्रांस नंतर कॅनडा. पण या चारही देशात कुठली गोष्ट अगदी सारखी म्हणून आढळली तर ती म्हणजे चिन्यांचा सुकाळ. अगदी कुठल्याही शहरात जा गोरा माणूस दिसेल नं दिसेल पण चीनी हमखास दिसणारच!  आणि आता तर मी ओटावा मध्ये चायना टाउन च्या बाजूलाच राहतो त्यामुळे स्वतालाच आठवण देत रहावी लागते कि मी कॅनडात आहे चीन मध्ये नाही. 

    चीनी माणूस म्हटला कि एक आकृती डोळ्यासमोर येते बसकं नाक , छोटी देहयष्टी आणि डोळ्यावर चिकटवलेला ८-१० केसांचा समूह ज्याला आपण भिवया असं म्हणू ! चीनी देवाच्या stock मध्ये डोळ्यांची कमतरता असावी हे स्पष्ट दिसतं. म्हणूनच एकाला द्यायचे डोळे दोघांमध्ये share  केले आणि चिन्याला मिचमिचे डोळे मिळाले.

    "चीनी" हा शब्द जरी वाचला तरी माझ्या डोक्यात प्रश्नांचा भुंगा गुणगुण करायला लागतो.
युरोप - अमेरिकेत स्थायिक झालेल्या चिन्यांची नावं डिंग - डॉंन्ग , पिंग - पौंग , हे-हुंग-ते-हुंग किंवा चाऊ- मेन अशी नसून रिचर्ड , थॉमस , फ्रेड असी कशी ? हा अगदी मला अनादी  काळापासून पडलेला प्रश्न त्यातलाच एक.  आमच्याच बिल्डिंग मधल्या फ्रेन्क ला हा प्रश्न मी विचारलं. त्याचा उत्तर अत्यंत मार्मिक होतं. चीन मधल्या एका छोट्या गावातून आलेला हा, कॅनडात येण्याचा एकमेव उद्देश पैसे कमावणे. इथल्या लोकात मिसळता यावं म्हणून यानी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला ,  फा-हुंग-ली वरून हा फ्रेंक -ली झाला. "नावात काय आहे ?" हे shakespeare चं वाक्य एखादा चिनीच खरं करून दाखवू शकतो, उरलेले  आम्ही पामर नाव , जात , धर्म , वर्ण याचा व्यर्थ दुराभिमान घेऊन जन्मभर जगतो - भांडतो आणि  "अस्मिता" असं गोड नाव देऊन मोकळं होतो.
( "तरी बरे हो , भारत विकसित राष्ट्र नाही आणि अजून येथे चिन्यांचा फैलाव झालं नाही , नाहीतर सदाशिव पेठेत आपल्या बाजूला राहायला आलेला "मुकुंद सप्रे" नावचा गृहस्थ चीनी निघावा आणि फडके आजोबा भोवळ येऊन पडावे." )

     चिन्यांमध्ये मुबलक प्रमाणात सापडणारा एक गुण म्हणजे कंजुषी . यांची कंजुषी त्यांच्या नावापासूनच सुरु होते.  "चिमणराव गोवर्धनदास डोणगावकर" वगेरे यासारख्या भारदस्त नावाचा चीनी शोधून देखील सापडायचा नाही. त्यामुळेच मला कधी कधी चीनी लोक हे लेले , नेने यांचे नातेवाईक तर नाहीत ना अशी शंका येते.  सर्व २ अक्षरी एकरांती आडनावांची क्षमा मागतोय  - तुमचं हे बिरूद काढून चिन्यांना दिल्याबद्दल. चीनी माणूस अत्यंत कंजूष आणि व्यवहारी . कुठेतरी वाचलं होतं कि चीनी माणसात आणि भारतीय माणसात कधीच व्यवहार होऊ शकत नाही. कारण चीनी दुकानदार वस्तूचा भाव कमी करत नाही आणि भारतीय मनुष्य भाव कमी केल्याशिवाय  काहीच विकत घेत नाही.

     Terminator , matrix मध्ये दाखवल्या प्रमाणे भविष्यात यंत्रामानवाच राज्य येणार नाही कदाचित, पण चीन्यांच राज्य येण्याची मात्र दाट शक्यता आहे. चीनी मालानी जगातल्या सगळ्या बाजारपेठा केव्हाच काबीज केल्या आहेत. आणि आता सगळ्या लोकांना पण चीनी बनवण्याचा एक कट शिजत असावं अशी मला दाट शंका आहे. बघा ना चीनी मुलीनी अमेरिकन मुलाशी लग्न केलं काय किंवा एखाद्या चीन्यानी सुंदर चिकण्या गो-या  तरुणीशी लग्न केलं काय त्यांना होणारं अपत्य हे चीनी छापखान्यातून छापून आल्यासारखंच चीनी बनावटीचंच  कसं काय निघतं? आणि बाकी कुणाला असेल नसेल चिन्यांचा सगळ्यात मोठा धोका शिवसेनेच्या वाघांना आहे . परवाच वाचलं कि जगात सगळ्यात जास्त वाघ चीन मध्ये मारले जातात म्हणे म्हणून आता फ़क़्त १४०० वाघ राहिले आहेत. बाळासाहेब - राजसाहेब हिंदी भाषिकांविरुद्ध आंदोलनं करायच्या ऐवजी चीन्यांविरुद्ध करा . हा ड्रेगन वाघांना खाऊन कधी नामशेष करेल काही सांगता यायचं नाही.   कुणी तरी त्या माशेलकरांना सांगा रे, हळदीच  कसलं काय पेटंट घेता "सचिन तेंडूलकरचं"  पेटंट घ्या स"चिन" च्या नावात चीनी लोक कधीचेच बसले आहेत "भाई भाई" म्हणता म्हणता कधी सचिन ला घेऊन जातील कळणार नाही.  चीन्यांनो तुम्ही तिबेट घेतला आम्ही काही बोललो नाही  , अरुणाचल प्रदेश चा बराच भाग घेतला आम्ही मुग गिळून गप्प राहिलो , पण स"चीन" ला घेतलेला आम्हाला अजिबात चालणार नाही सांगून ठेवतो.

     वेल म्हणूनच म्हणतो  चीनी माणूस आणि चीन म्हणजे एक विलक्षण कोडं आहे .  आणि जितकं तुम्ही हे कोडं सोडवायला जाल तितके गुंतून पडाल. विश्वास बसत नाही ? मग सांगा बरं बोन-चायना मध्ये चीनी माणसांची हाडं कां वापरतात ते ? (एका दंत कथे नुसार जेल मध्ये मेलेल्या चिन्यांच्या हाडापासून बोन चायना तयार होतं )  किंवा क्रिकेट चा "क" सुद्धा चिन्यांना कळत नसतांना "चायना मन" असा गोलंदाजी चा प्रकार कसा काय आला ?

     बापरे वाचत वाचत तुम्ही शेवटपर्यंत पोचलात. Nobel Price for Patience असं काही असतं तर तुमची नक्की शिफारस केली असती. असो "अजमल कसाब" सारखा मराठी बोलणारा कुणी मराठी भाषिक चीनी असेल आणि तो हा लेख वाचत असेल तर त्याची हात जोडून माफी मागतो.
हा लेख म्हणजे " अज्ञान देवे रचिला पाया , लेख झालासे कळस " असा आहे , त्यामुळे फार कुणी मनावर घेऊ नये अशी माफक अपेक्षा. लेखकाचे नाव "शंतनू देव" असे असल्यामुळे त्यास "अज्ञान देव" असं संबोधित केल्यास माझी काही हरकत नाही.
     ळावे लोभ असावा !
तुमचा शंतनू

वरील पोस्ट मराठी विश्व मधल्या एप्रिल च्या द्वैमासिकात प्रसिद्ध झाली ती मित्र-मंडळींसाठी ईथे प्रकाशित करतोय. या लेखाला प्रकाशित केल्याबद्दल मराठी विश्व आणि संपादक - राजश्री कुळकर्णी यांचे आभार
http://marathivishwa.org/vrutta.html

10 comments:

 1. Fantastic post. Most impressive. Ase ajun kahi lekh lihi, ethe aalyawar pustak prasiddha karu. Pu.La Naa Chini bhetale asate tar kadachit asach lihala asata tyanni.

  Great going.
  Kudos.

  ReplyDelete
 2. BY THE WAY, EKARANTINCHA ASA ULLEKH. TUJHA SASAR EKARANTI AAHE HE WISARU NAKOS.

  NAGPUR WAPAS AANA HAI KE NAHI. ????
  :D:D:D:D

  ReplyDelete
 3. जबरा रे! मस्त!

  ReplyDelete
 4. @प्रोफेट - खूप खुप धन्यवाद !
  @सुजित - काय गम्मत करतोस कि काय ? पु लं कुठे ? मी कुठे ? काहीच तुलना नाही राव ! त्यांचं लिखाण वाचायला मिळालं हेच आपलं भाग्य समजायचं ! पण कौतुक केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद !
  आणि हो आमच्या एकरांती कुटुंबाकडून परवानगी घेतल्यानंतरच प्रकाशित केलंय बरं का काणे साहेब ! :))

  ReplyDelete
 5. He he, nahitar asa kahi publish jhala nasata he mala mahiti aahe.

  ReplyDelete
 6. Saheb ... chanach lihita tumhi .. tumchya lekhan pravasa sathi shubhechya :)

  ReplyDelete
 7. शंतनू...झकास लिहिलंस...खरंच भविष्यात आपला शेजारीही(घरगुती)चिनी असेल ह्याबद्दल मनात शंका नाही...इतकं पद्धतशीर आक्रमण ते करत आहेत...
  नाहीतरी आपल्याकडची तरूण पिढी ’चायनीज’ पदार्थांची शौकीन आहेच...पुढे रोज हे असलंच खाण्यासाठी चिनी युवतींशी लग्न करण्यासाठीही ते मागेपुढे बघणार नाहीत. ;)

  ReplyDelete
 8. hi shantanu, this is prathamesh.......tujhe mee barech lekh vachlet..mast ahet.......chinimati tar best-ch. very nice keep it up!

  ReplyDelete
 9. Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com

  ReplyDelete
 10. kasla sundar lekh lihilas...ani barobar suddha.ata me sydneyt ahe...singapore la hote tyapekshya jara chini kami ahet.pn ithe suddha tech chehre saglikade.

  ReplyDelete