फ्रेंचांच्या देशात माझा पाहिलं पाऊल पडलं ते चार्लेस द गौल , paris एअरपोर्ट वर. फ्रांस मध्ये कामानिमित्त मला २ महिने राहायचं होतं , ओळखीचे काही लोक तिथे असल्यामुळे आणि या आधी बराच परदेश प्रवास केला असल्यामुळे तसा मी अगदीच निर्धास्त होतो. मित्रांनी पत्ता आधीच सांगून ठेवला होता त्याप्रमाणे एअरपोर्ट वरून मला "मोपांना" नावाच्या रेल्वे स्टेशन वर जाऊन लुमो ची ट्रेन पकडायची होती. पहिली गोची येथेच झाली. उतरल्यावर सगळीकडे फ्रेच मधले फलक. आणि गावांची नावं तर अशी कि पहिल्यांदा आलेल्याला कळू नये म्हणून मुद्दाम डा विन्ची कोड सारखी क्लीष्ट करून ठेवलेली! शेवटी एकदाचं ते मोपांना (montparnasse ) स्टेशन सापडलं ज्या गाव ला जायचं ते लुमो सुद्धा le mans अशा स्पेलिंग मध्ये स्वताला लपवून बसलं होतं.
ट्रेन नि मी संध्याकाळी घरी पोचलो . आधीचे मित्र होतेच त्यामुळे १-२ तासातच छान रुळलो. आशिष नावाचा माझा मित्र सकाळी मला बस नि ऑफिस ला घेऊन गेला . मी सगळ्या खाणा - खुणा पाहून ठेवल्या घरासमोरच मोठ्ठा कॅथेड्रल होता हि मोठ्ठी खुण होती. गाव छोटा असलं तरी बस सेवा अप्रतिम होती .
प्रवासामुळे थकला असल्यामुळे मी अंमळ जरा लवकर जायचा विचार केला. तिच ४१ नंबरची बस पकडली आणि एकटाच निघालो . कॅथेड्रल दिसला कि उतरायचं म्हणून खिडकीतून बघत होतो. बराच वेळ झालं कॅथेड्रल काही येईना. शेवटी बस एका ठिकाणी थांबली ड्रायव्हर ला मोडकं तोडकं इंग्रजी येत होता तो म्हणाला हाच लास्ट stop . मनात म्हटलं चायला एवढा मोठा कॅथेड्रल गेला कुठे - "जमि खा गयी या आसमा निगल गया". पण माझी हि फुगलेली विनोदबुद्धी थोड्याच वेळात हवा गेलेल्या फुग्यासारखी होणार होती.
त्यात म्हटलं याच बस नि वापस जावं तर ती शेवटची बस होती. म्हणजे आता बोंब. बरं बर्याच देशात फिरल्यामुळे माझ्याजवळ अति आत्मविश्वास! फ्रेंच manager सोडून कोणाचाच फोन नंबर नव्हता . बरं येथले पत्ते ईतके विचित्र कि मला आठवेना काल आपणा taxi वाल्याला काय पत्ता सांगितला होता ते! खांद्यावर laptop ची ब्याग त्यात पहिला दिवस असल्यामुळे घेतलेल्या कोर्या diaries , visiting कार्डस एकूण ५ किलो वजन असावं. मग मी उलट्या दिशेनी पायी निघायला सुरुवात केली या बस stop पासून आधीच्या - मग त्याच्या आधीच्या असं करत करत कधी ना कधी कॅथेड्रल दिसेलच या आशेनी. पण एक तासानंतरही ते कॅथेड्रल दिसेना. मग माझी बोबडी वळायला लागली. पब्लिक फोन बूथ मध्ये सुद्धा कसलं तरी कार्ड लागत होता, माझ्याकडे ते देखील नव्हता . देवाचा धावा करायची वेळ आली होती.
तेवढ्यात सायकल वरून मला एक फ्रेंच विध्यार्थी जाताना दिसला. मी त्याला मदतीसाठी थांबवलं. त्याला मी इंग्रजीत सांगतोय मी कि बाबारे मला कॅथेड्रल ला जायचंय . पण याला माझं एकही अक्षर कळेना. मी खुणा करून सांगितल्यावर त्याला कळलं कि मी कसलस चर्च शोधतोय. याचा नाव "तुसो" बरं का! तर तुसो माझ्यासाठी सायकल वरून उतरला आणि सायकल हातात घेऊन चालू लागला. आम्ही २-३ चर्च समोर जाऊन आलो पण हे नाही ते नाही असंच होत होतं.फ्रांस मध्ये लोक कमी आणि चर्च जास्त कि काय अशी शंका मला यायला लागली.
चर्च चा प्लान फसल्यावर मी त्याला नदी च्या खुणा करून दाखवू लागलो. त्याला काही समजेना. मी रडकुंडीला आलो होतो.तो त्याच्या भाषेत मला धीर देत होता, एव्हाना दीड - दोन तास चालून झालं होता ब्याग मुळे माझी पाठ दुखायला लागली होती, शेवटी विचार आला सरळ पोलीस स्टेशन मध्ये जावं. मी पोचलो नाही म्हटल्यावर कुणी ना कुणी complaint देईलच. पण सुदैवनि पाचच मिनिटात दूर नदी दिसली.
नदीच्या किनाऱ्यावर ते कॅथेड्रल सुद्धा तसच होतं आणि एका बाजूला आमचा घर पण ! तुसो चा इमेल घेऊन त्याला धन्यवाद म्हणून मी घरी शिरलो . घरी आल्यावर मित्रांकडून कळलं कि बस चा जाण्याचा आणि येण्याचा रस्ता वेगळा आहे. ठरवलं काही झालं तरी आता फ्रेंच शिकायचं बस.
आता त्या घटनेकडे जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा वाटतं तो मला अचानक मदत करणारा देवदूत तुसो, ( Toussant याला मी बरेच दिवस 'तू संत' असंच म्हणायचो . आता देखील हा माझा फार छान मित्र आहे. ) याला नक्कीच देवानी पाठवलं असणार मदत करायला. पण मग देवानी इंग्लिश बोलणार्याला कां पाठवला नाही असा पण विचार येतो. फ्रेंचांच्या प्रदेशात देवाला कुणी इंग्रजी भाषिक भेटलं नसेल असं विचार करून मी देवाला लक्ष लक्ष धन्यवाद देतो.! काहीही ओळख नसताना केवळ मदत करावी म्हणून १ तास पायपीट करणारा हा "खुदा" पुन्हा एकदा आठवायचं कारण म्हणजे नुकतंच ऐकलेलं हे गाणं -
धुंधला जाये जो मंझिले, इक पल को तू नझर झुका
तेरी किस्मत तू बदल दे , रख हिम्मत बस चल दे
तेरे साथी मेरे कदमो के है निशां, तू ना जाने आस पास है खुदा
तू ना जाने आस पास है खुदा
क्या खूब कहा है खां साहब. वाह ...
मेपल च्या पानांना पुन्हा बहर येणार अस दिसतंय .
ReplyDeleteयेवू द्या आता अजून पोस्ट
हो आता पुन्हा नियमितपणे लिहायचंय. बघूया कसं जमतंय ते. धन्यवाद सागर !
ReplyDeleteHey gaane punya chya ekandarit roads saathi agdi apt ahe .... Tu na jane aas pass hai khuda :D..
ReplyDeleteशंतनू,
ReplyDeleteमीही ऍमस्टरडॅममध्ये असाच अडकलो होतो... तेव्हा दोन भारतीय मुलं देवासारखी भेटलेली...
मस्त लिहिलं आहेस...लिहित राहा नियमित आता! :)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteशंतनू, किती घाबरा झाला असेल तुझा जीव याची जाणीव होतेये. खरेच तो ’तुसो’ देवासारखाच भेटला तुला. :)
ReplyDeleteखूप दिवसांनी लिहीलेस तू. येवू देत अजून...
i can imagine the situation as i faced the same..........really god is there.....
ReplyDeleteHi trip adhavanit ajhunahi taji aahe.
ReplyDeleteAshish Bhide
Yes TRue ashish. One of the best onsite trips I ever had.
ReplyDeleteयाचा नाव "तुसो" बरं का! तर तुसो माझ्यासाठी सायकल वरून उतरला आणि सायकल हातात घेऊन चालू लागला. आम्ही २-३ चर्च समोर जाऊन आलो पण हे नाही ते नाही असंच होत होतं.फ्रांस मध्ये लोक कमी आणि चर्च जास्त कि काय अशी शंका मला यायला लागली.
ReplyDeleteविनोदाला सिर्फ बहाना चाहिये ....
आवडल.
"विनोदाला सिर्फ बहाना चाहिये" श्री ,खरं आहे. खूप खूप आभार
ReplyDeleteAai shapath....
ReplyDeleteMi next month madhye yenar aahe Paris la.. ekandarit awaghad prakaran aahe tar....
btw... Nice post !!!
Cheers!
Thanks @Shardul
ReplyDeleteमस्त अनुभवकथन ...
ReplyDeleteतू ज्या काळी तिकडे गेलास, त्यावेळी अॅन्ड्रोइड/अॅपल चा जमाना नव्हता नाहीतर ही वेळ नसती आली...कदाचित अशा अनुभवांमुळे तूच मोबाईल मध्ये पण जीपीसी असावे अशा कल्पना गुगल/अॅपल/नोकिया यांना दिल्या असाव्यात..
@Yogesh - hehe khara aahe. Aajkal sagla kiti soppa zalay. Such a change in just 5-6 years
ReplyDeletemast aahey anubhav.
ReplyDeleteKhup diwas zale kahi lihal nahis.. You have written some wonderful posts here.. please do keep writing..
ReplyDelete