Saturday, December 19, 2009

आमचं वॉर्म वेदर !

मेपल ची पाने
पान पाहिले - आमचं वॉर्म वेदर !

तुम्ही कधी दिवसातून दोनदा ७० किलो सामानाच packing केला आहे ? वेल नसेल केलं तर सांगतो तुम्हाला.
मी रोज दिवसातून दोनदा Packing करतो - माझा स्वतःच .
हो आता याला packing नाही म्हणणार तर अजून काय न ?
अजून विश्वास बसत नाही ? बरं सांगतो समजावून .

"आज जरा वॉर्म आहे !" असं येथले लोक म्हणतात.
म्हणजे अगदी आमची आजी म्हणते न त्या टोन मध्ये - " अरे .... तुला सांगते
बबन आमच्या काळी काय थंडी पडायची. का... य थंडी पडायची. आता काय हिवाळ्यात मजा राहिली नाही रे ! "
अगदी तसं ...

पण येथला वॉर्म म्हणजे जरा वेगळं - आजचं वॉर्म म्हणजे -२० से. होतं.
आणि विंड चिल ची वगेरे भानगड घेऊन -३० .

असो तर या वॉर्म हवामानात मी किती कपडे Pack करावे - अहो म्हणजे घालावे ? जाऊ द्या तुमची मजल १० च्या पुढे नक्की जाणार नाही . तर तुम्हाला लिस्ट च देतो
बनिअन -१
वोर्मेर शर्ट- ३
शर्ट - १
पुलोवर - १
जाकेट - १
वूलेन + मंकी टोपी - २
वूलेन + लेदर हातमोजे - 2
यु वेअर - १
वोर्मेर pant - ३
मोजे - २
आईस शूज - १

टोटल = १८ - अहो वॉर्म वेदर ना !

मुंबईत असतांना उठल्यावर बरोबर १५ मिनिटात तयार व्हायचो .
येथे मात्र फक्त कपडे घालायलाच २० मिनिटे लागतात . आणि बाकी सोपस्कार पण आहेतच.
पूर्ण अंगाला moisturiser लावा रोज. एक दिवस लावला नाही तर वाट लागते. सगळा शरीर उलून जातं.

स्नो होता तेव्हा बारा होता असं म्हणायची पाळी आलीय .
आता हिवाळ्या नि पुढचा गेअर टाकला आहे. स्नो जाऊन सगळी कडे बर्फाच्या लाद्या आल्या आहेत.
"सावधानी हटी और दुर्घटना घटी ! " असं सतत आठवत राहावं ईतका सगळीकडे slippery झालंय.

Fridge मध्ये सुद्धा जिवंत राहणाऱ्या झुरळाला काय वाटत असेल त्याचं उत्तर कुणाला हवा असेल तर त्यांनी मला विचारावं.

बाकी काय " आलिया भोगासी - असावे सादर !"

मेपलचं पुढचं पान तयार झालं कि पाठवतोच पुन्हा .

2 comments:

  1. माझी सध्या ही अवस्था आहे..मला हि १५-२० मि. लागतात कपडे घालायला. घरी आल्यावर केव्हा कपडे काढतोय (आणि घरचे कपडे घालतोय) असे होते.

    ReplyDelete
  2. hahahah..majja ali vachun warm weather baddal..ani mumbaitala weather kiti mast ahe tyachi pan..

    ReplyDelete