Tuesday, December 22, 2009

सागरास ...

१९०९ मध्ये लंडन मध्ये असताना सावरकरांचा ब्रिटिशांनी छळ करायला सुरुवात केली. त्यांना कुठेही राहायला जागा मिळत नव्हती. म्हणून सावरकरांनी लंडन पासून ५० मैलावर समुद्रकिनारी असलेल्या ब्रायटन मध्ये जायचं ठरवलं. तेव्हा बिपिनचंद्र पालांचे पुत्र निरंजन पाल त्यांना वारंवार भेटत असत. अशाच एका भेटीत समुद्रकिनारी चर्चा करत असतांना सावरकर अचानक काही तरी गुणगुणायला लागले. त्या ओळी होत्या "ने मजसी ने परत मातृभूमीला , सागरा प्राण तळमळला !"




दुसरं पान लिहितांना जी या गाण्याच्या जन्मास्थानाबद्दल चूक झाली होती ती चूक दुरुस्त केली आहे. चुकीबद्दल क्षमस्व !




संदर्भ: हरवलेली पाने शोधतांना

सुजित, चूक दाखवून दिल्याबद्दल तुझा खुप आभारी आहे.


तुमचा शंतनू

1 comment:

  1. छान आहे तुमचा ब्लाँग.आवडला..!!
    "प्राक्तन फ़िदाच झाले" चा संदर्भ लेखात वापरू शकता.

    ReplyDelete