सर्वप्रथम धन्यवाद ! पहिल्या पानाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल !
बरेच replies आलेत. अगदी "तू पण लिहितोस वाटतं !" पासून "तू कशाला लिहितोस बाबा ? " पर्यंत !
यातला गमतीचा भाग सोडला तर प्रश्न मात्र अगदी बरोबर आहे. म्हणजे मी काही अगदीच वाईट लिहित नाही , पण मग आतापर्यंत कधीच का काही लिहिलं नाही?
प्रश्न बांका आहे खरा , पण उत्तर सुद्धा तेवढाच सोपं आहे. बर जरा कोड्यातच सांगायचं झाला तर तुम्हीच सांगा . लो. टिळकांना गीता-रहस्य लिहायला मंडाले चा तुरुंगच का सापडला ? किंवा सावरकरांना "ने मजसी ने .." सारखं अजरामर काव्य करायला
इंग्लंड मधल्या ब्रायटन च्या किनाऱ्यावर कां जावं लागलं असेल ?
मिळालं न उत्तर ?
बरोबर ! याचं कारण म्हणजे येथे कॅनडा मध्ये आम्ही दोघेच. अहो दोघेच म्हणजे "मै, और मेरी तनहाई " . आणि माझी तनहाई हि अमिताभ च्या "तनहाई" सारखी "अक्सर बाते" वगेरे काही करत नाही. म्हणून हा लेखणी चा आधार - बोलण्यासाठी , संवाद साधण्यासाठी .
वरची काही विधानं वाचून काही लोकांना नक्की वाटत असणार , "थोडंसं काय ते लिहिलं याने आणि लगेच स्वताला टिळकाच्या आणि सावरकरांच्या पंगतीला नेऊन बसवलं. लायकी आहे का ? " तर अशा सगळ्यांची हात जोडून माफी. असं काहीही करण्याचा माझा प्रयत्न नाही अणि धाडस तर नाहीच नाही .
इतिहासातले हे दोन युगपुरुष होते. प्रस्थापितांविरुद्ध जाऊन देशप्रेम करणं हा एकंच त्यांचा ध्यास !
पण असं असूनही आज जेव्हा स्वतंत्र भारताच्या लोकसभेच्या सदनातून सावरकरांसारख्या एका देशभक्ताचा फोटो बाहेर फेकून पायदळी तुडवल्या जातो, तेव्हा लाज वाटते मला मी भारतीय असण्याची. अरे ज्या राजकारण्यांची सावरकरांच्या पायातली पैजार व्हायची सुद्धा लायकी नाही त्यांनी या अशा थोर देशभक्ताला देशद्रोही म्हणून मोकळं व्हावं ? राज साहेब कुठे आहात ?
आमच्या लहानपणी आम्हाला ईतिहासात सावरकरांच्या हिमतीची आणि पराक्रमाची साक्ष देणारी फ्रांस च्या किनार्यावर पोहून जाण्याची गोष्ट होती , त्यांच्या कविता होत्या . पण आता काय तर म्हणे सावरकर देशद्रोही ना ? म्हणून इतिहासातून त्यांना काढणार . खरच भीती वाटते, पुढच्या पिढीपर्यंत हा असा fabricated इतिहास पोचला तर ? तर कदाचित सावरकर म्हणजे गांधींचे खुनी असंच ते समजतील. आणि तो दिवस जर आला तर तो भारताच्या नशिबातला एक दुर्दैवी दिवस असेल.
पण खरच का इतिहासाला असं twist करता येतं ? आणि असं जर युग नु युगे होत असेल तर मग माझ्यापर्यंत जो इतिहास पोचला तो तरी किती खरा असेल ?
असं म्हणतात "Winners write the history ! " मग कदाचित जर दुसरे महायुद्ध हिटलर जिंकला असता तर आज कदाचित "तो एक युगपुरुष" वगेरे म्हणून लोकांनी त्याची प्रशंसा केली असती. आणि हिटलर नि कसं धर्माचं पालन केलं यावर पुस्तक लिहिल्या गेली असती. "हिटलर , तुझी चूक एकंच . तू हरलास ! बाबारे हे जग जिंकणाऱ्याच आहे. येथे हरणारा एक तर विस्मृतीच्या पडद्याआड़ जातो नाही तर एक खलनायक म्हणून अजरामर होतो . "
आता कळलं मला , आपण नेहमी जे म्हणतो कि "धर्माचाच शेवटी विजय होतो ." ते कसं .
"धर्माचाच शेवटी विजय होतो" असं नाही तर " जो जिंकतो त्याचाच धर्म असतो."
म्हणूनच तर आपल्या बायको ला सुद्धा पणाला लावणाऱ्या एका नीच माणसाचं नाव आपण महाभारतात "धर्मराज " असं वाचतो. किंवा तितक्याच अधर्माने कर्णाला रथातून उतरल्यावर निशत्र असतांना मारायला लावणाऱ्या कृष्णाला देव म्हणून पुजतो.
संदेश एकंच ! जग जिंकणाऱ्याच आहे त्यामुळे काहीही करा पण हरू नका .
उत्तर कितीही चुकलं असला तरी प्रश्न बरोबर आहे. तेव्हा हे वाचून कणभर विचार करायला जर मी भाग पाडलं असेल तर लिहिणं सार्थ झालं असं मी समजीन.
दुसरं पान आता ईथेच संपवतो. सगळ्यांनी माझ्या मताशी सहमत असण्याची गरज नाहीच..
वाऱ्यानी जशी अनेक पाने उडून येतात त्यातली काही हिरवीगार तजेलदार असतात तर काही पाचोळा झालेली. तसलंच एक पाचोळा झालेला पान समजा हवं तर...
शेवट एका आवडत्या कवितेच्या काही ओळींनी करतो ...
उत्तरे चुकू शकतात , गणित चुकत नाही पावले थकू शकतात , अंतरे थकत नाहीत वाळूवरची अक्षरे पुसट होत जातात डोळ्यांचे रंग फिकट होत जातात तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला या कवितांना , शहर बाहेर पसरलेल्या संकेत स्थळांना विसरत चाललेल्या आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चीमरंगी आभाळ अन विसरत चालले आहे आभाळही गोन्दायला विसरणारे हिरवेगर्द तळे आता आठवतायेत ते फक्त काळेभोर डोळे " |
Abey ekdum sahi lihile aahey..both the posts and i like your template also...start posting some photos also..some daily pics..will become like a personal + photoblog...any daily pics that you click...will be a good value add for this blog...people like reading such blogs and i would advice that as your posts are small...write them in Marathi as well as English...English post can be simple and you can focus on your marathi...
ReplyDeleteHi shantanu.. good one.. looking forward for some gr8 articles frm u.. all the best.
ReplyDeleteaRE, "nE mAJASI nE" eNGLAND mADHYE sHIKAT asatanna lihila hota Sawarkaranni. Lihila chhan aahes, pan, Tilak aani Sawarkaranna "Kalpurush" mhanahe, ha wakya prayog, mala watata thodaa chukato aahe. "Yugpurush" ha shabda barobar rahil kadachit.
ReplyDeleteAajkaal mi marathi farasaa wachat nahi, tya mule jara sambhram hoto aahe. Lihit rahaa. Devnagarit kasa lihayacha, ya cha khulasa kelas tar baraa hoiil.
Sujit
jar hi chukichi mahiti asel tar sorry. maza eetihaas kaahi faar pukka naahi pan mala jevdha mahiti aahe tyapramane "Ne Majasi .." was written in cellular jail
ReplyDeletePlease see this for reference
http://en.wikipedia.org/wiki/Vinayak_Damodar_Savarkar
or
http://www.outlookindia.com/rantsmag.asp?fodname=20030303&fname=VHP%20(F)&sid=1&pn=18
if you have any other paces to substantiate England, please let me know. I will reverify and change the content.
"धर्माचाच शेवटी विजय होतो" असं नाही तर " जो जिंकतो त्याचाच धर्म असतो."
ReplyDeleteहे अगदी खरे आहे...
जो योग्यता असून ही हरतो त्याला केवळ सहानुभूती मिळते.
kavita sundar ahe.
ReplyDeletepotachi khalgi bharnya sathi so called nokari saglech kartat..ani aajkalchya E jagat rahtana..bhavnanna pallavit thevun aplyat le antarman ughdayla kwachitach kunala savad aste..
ReplyDeletetya rasik kavila ani utsfurt lekhakala majhya khup shubhechha!
gargi!
- Gargi
Dhanyawad Gargi, asmi and anagha
ReplyDeleteखूपच छन लिहिलेस रे॰ वाचून आनंद वाटला।
ReplyDelete