Wednesday, January 27, 2010

ऑल इडीयटस

चौथे  पान - ऑल इडीयटस

    3 idiots बघितला . फारच सुंदर बनवला आहे. घरी आल्यावर पिक्चर चे reviews वाचत होतो. एका २५ - २६ वर्षाच्या मुलीनी लिहिलेला अभिप्राय वाचला. "माझ्या आई-बाबांनी जर हि movie ७-८ वर्षांपूर्वी बघितली असती तर कदाचित आज मी एक engineer न होता एखादी कलाकार असते .. " आणि असेच बर्याच लोकांनी अभिप्राय दिले होते ..
आणि मन तिथेच थांबलं. वाटलं , काहीतरी चुकतंय ....  3 idiots च्या निमित्तानी आपण सरळ आपल्या आई-बाबांना दोष देऊन

Thursday, January 14, 2010

आयुष्य - एक प्रवास

तिसरे पान - आयुष्य - एक प्रवास

गेली अनेक वर्ष , हा अनुत्तरीत प्रश्न माझ्या डोक्यात होता. पण जिथे विचारलं , जिथे डोकावलं , जिथे कुठे शोधलं तिथे तीच चाकोरीतली उत्तरं मिळायची.


"सगळे करतात ! ते वेडे आहेत का ?" किंवा "कधीतरी तर करावंच लागणार नं ! " एक ना अनेक उत्तरं - पण सगळी  एकाच पठडीतले ...

Saturday, December 26, 2009

हरवलेली पाने शोधतांना

दुसरे पान -  हरवलेली पाने शोधतांना

सर्वप्रथम धन्यवाद ! पहिल्या पानाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल !

बरेच replies आलेत. अगदी "तू पण लिहितोस वाटतं !" पासून "तू कशाला लिहितोस बाबा ? " पर्यंत !

यातला गमतीचा भाग सोडला तर प्रश्न मात्र अगदी बरोबर आहे. म्हणजे मी काही अगदीच वाईट लिहित नाही , पण मग आतापर्यंत कधीच का काही लिहिलं नाही?

प्रश्न बांका आहे खरा , पण उत्तर सुद्धा तेवढाच सोपं आहे. बर जरा कोड्यातच सांगायचं झाला तर तुम्हीच सांगा . लो. टिळकांना गीता-रहस्य लिहायला मंडाले चा तुरुंगच का सापडला ? किंवा सावरकरांना "ने मजसी ने .." सारखं अजरामर काव्य करायला

Tuesday, December 22, 2009

सागरास ...

१९०९ मध्ये लंडन मध्ये असताना सावरकरांचा ब्रिटिशांनी छळ करायला सुरुवात केली. त्यांना कुठेही राहायला जागा मिळत नव्हती. म्हणून सावरकरांनी लंडन पासून ५० मैलावर समुद्रकिनारी असलेल्या ब्रायटन मध्ये जायचं ठरवलं. तेव्हा बिपिनचंद्र पालांचे पुत्र निरंजन पाल त्यांना वारंवार भेटत असत. अशाच एका भेटीत समुद्रकिनारी चर्चा करत असतांना सावरकर अचानक काही तरी गुणगुणायला लागले. त्या ओळी होत्या "ने मजसी ने परत मातृभूमीला , सागरा प्राण तळमळला !"




दुसरं पान लिहितांना जी या गाण्याच्या जन्मास्थानाबद्दल चूक झाली होती ती चूक दुरुस्त केली आहे. चुकीबद्दल क्षमस्व !




संदर्भ: हरवलेली पाने शोधतांना

सुजित, चूक दाखवून दिल्याबद्दल तुझा खुप आभारी आहे.


तुमचा शंतनू

Saturday, December 19, 2009

आमचं वॉर्म वेदर !

मेपल ची पाने
पान पाहिले - आमचं वॉर्म वेदर !

तुम्ही कधी दिवसातून दोनदा ७० किलो सामानाच packing केला आहे ? वेल नसेल केलं तर सांगतो तुम्हाला.
मी रोज दिवसातून दोनदा Packing करतो - माझा स्वतःच .
हो आता याला packing नाही म्हणणार तर अजून काय न ?
अजून विश्वास बसत नाही ? बरं सांगतो समजावून .

"आज जरा वॉर्म आहे !" असं येथले लोक म्हणतात.
म्हणजे अगदी आमची आजी म्हणते न त्या टोन मध्ये - " अरे .... तुला सांगते